मराठी भाषा शिकणे व शिकवणे हे दोन्ही कठिण आहे असे माझे ठाम मत आहे. उदा. आमची मुलगी मधील ‘च’ चा देशी उच्चार आमच़ा मुलगा मध्ये पर्शियन होऊन येतो.
र्हस्व दीर्घाचे ’अनियमित’ नियम जाणून घेताना तर सर्वच मराठी जनांची फेंफें उडते, तिथे अमराठी जनांची काय कथा? इंग्रजी भाषा शिकताना जसे 'का' विचारणे व्यर्थ आहेच तशीच काहीशी स्थिती मराठी भाषा शिकताना होते. असे असताना गेल्या आठवड्यात योगायोगाने काही इंग्रजी माध्यमातील इ. ५-६-७-८ वीच्या विद्यार्थ्यांना अमराठी मुलांना मराठी शिकवायचा योग आला. 'हसत खेळत शिकविणे’ हे माझे तत्त्व असल्यामुळे एक गंमत म्हणून आपण लहानपणी खेळायचो तो ’नाव, गाव, फळ, फुल, रंग, प्राणी, पक्षी, खेळ, वस्तु’ हा खेळ घेतला. आधी मुलांना वाटले की हे सर्व इंग्रजीतून लिहायचे आहे. पण जेव्हा मराठी भाषेतील शब्द वापरायचे आहेत हे कळले तेव्हा त्यांचा विरस झाला. तरी पण त्यांनी नेटाने प्रयत्न करून, दिलेल्या संकेतांच्या आधारे बरेचसे शब्द शोधून काढले. त्यातल्या त्यात नाव, गाव, वस्तुंची नावे शोधणे त्यांना फारसे कठिण गेले नाही. मात्र ‘ह’ अक्षरावरून पक्षी शोधणे, ‘ब’ आणि ‘म’ वरूनफळे व रंग शोधणे, ‘र’ वरून खेळ शोधणे इ. इ.
मला पण कठिण गेले.
पुलंच्या ‘असा मी असामी’ चा पगडा असल्याने ‘ब’ आणि ‘म’ वरून रंग शोधायचा विचार आला तेव्हा मनात बैंगणी व मळखाऊ असे दोन शब्द रुंजी घालायला लागले. असो.
मला आठवलेली काही फळ, फुल, प्राणी, पक्षी, रंग व खेळ ह्यांची नावे सोबत देत आहे.
त्यामध्ये आपणही भर घालावी ही विनम्र विनंती. तसेच काही शब्द मुद्दामच पांढर्या रंगात देत आहे. आपल्याला जमले तर आपण आधी आठवून पहा आणि आठवले नाहीच तर मात्र ते शब्द पहायला हरकत नाही.
वर्ण | फळ | फुल | रंग | प्राणी | पक्षी | खेळ |
ब | बोर, बदाम | बकुळ | बदामी | बेडूक, बैल | बगळा | - |
र | रामफळ | रातराणी | राखाडी, राणी | रेडा, रानगवा रानमांजर | राघू | रस्सीखेच |
ह | - | हिरवा चाफा | हिरवा | हत्ती | होला, हळद्या | हुतूतू |
म | मोसंबे | मोगरा, मल्लिका | मोरपिशी | माकड, मगर, मांजर, म्हैस | मोर | मामाचं पत्र हरवलं.. |
ख | खरबुज | - | खाकी | खवले मांजर, खेचर | - | खो - खो |
च | चिकू | चमेली, चाफा | चंदेरी | चित्ता | चिमणी | चोरपोलीस |
स | सीताफळ, सफरचंद | सदाफुली, सोनचाफा | सोनेरी, सफेद | साळींदर, सरडा, ससा | साळुंखी, ससाणा | सारीपाट |
प | पिस्ता, पेरु, पपनस | पारिजात | पिवळा, पोपटी | पांडा | पोपट | पकडापकडी |
अ | अननस, अंजीर | अबोली, अर्किड | अबोली, अंजिरी, आकाशी | अस्वल | अडई | आंधळी कोशिंबीर |
ब - फ: बोर
ReplyDeleteर - प: रोहित
ह - प: हंस
ख - खे: खांब खांब खांबोडी
प - प: पारवा
अ - फू: अनंत
द्राक्ष, दवणा, -, -, -, दोरीच्या उड्या.
ReplyDeleteअन्य उदाहरणे - सोनचाफा, मामाचे पत्र हरविले, आकाशी, पत्ते.
क - कलिंगड, काजु, कमळ, काळा, कुत्रा, कावळा, कब्बडी.
ग - गाय, गाढव, गेंडा, गरुड, गुलाबी, गुलछडी, गोरखचिंच, गुलाब, गिदीगिदी, गुलामचोर.
प - पाणघोडा, पाणगेंडा
नीलगाय, -, निळा, नारींगी, नीलकमल, नारींग, नारळ, -.
म - माळढोक.
अ - उंट.
त - तरस.
तरस, तित्तिर, तगर, तेरडा, ताडगोळे, तांबडा, -.
लांडगा, लांडोर, लाल, लिंबू, लिची, लिली, लपाछपी, लंगडी.
क - कांडेचोर, कोल्हा.
स - सूर्यफुल, सावळा, सूरपारंब्या.
ब - बेलफळ.
ग - गव्हाळ.
-, -, धवल, धानी, -, धोतरा, -.
'अ' वरून मराठीमध्ये पक्षीच नाही की काय ह्या विचाराने हैराण झाले होते. अशावेळी अचानक मारुतरावांचा अडईवरील लेख वाचायला मिळाला आणि आपले निसर्गज्ञान किती तोकडे आहे ह्याचा पुनःप्रत्यय आला.
रंगाने तांबुस, तपकिरी आणि चमकणारे लालसर डोळे असलेल्या अडई पक्ष्याला
रानबदक असेही म्हणतात. झिंगे, लहान मासे, कंद हे त्यांचे आवडते खाणे.
पावसाळा येताच लहान तळे, मोह, बेहडा, चिंच किंवा पळसाच्या झाडावर अडई नर व मादी अंडी घालण्यासाठी व त्यांचे संगोपन करण्यासाठी जोडी-जोडीने बसलेले दिसतात. त्यांची अंडी फिक्या पिवळसर रंगांची असतात.
http://monacoeye.com/birds/index_files/dendrocygna_bicolor_fulvous_whistling_duck_01.jpg