Wednesday, 8 July 2009

उपाय सुचवावा

मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय (मुंमग्र) दादर शाखेची प्रथम बालविभागाची सदस्या होते व आता सामान्य विभागाची सदस्या आहे.

माझ्या लहानपणी दूरचित्रवाणी नावाचा सर्व मनोरंजनांच्या साधनांना भस्म करणारा असुर फारसा कोणाकडे नसल्यामुळे बालविभाग सुद्धा दणकून चालायचा. मनोरंजनाची अन्य साधने होती पण वाचनालयाला पर्याय ती होऊ शकत नव्हती.

कालांतराने ग्रंथालयाची बालविभागाची बरीच पुस्तके गहाळ झाल्यावर, वेगवेगळे सदस्य क्रमांक घेऊन झाल्यावर यथावकाश मी सामान्य सदस्या झाले. म्हणजे आता मोठ्यांच्या विभागात आले होते. इथे गुप्तेबाईंच्या सारख्या तत्पर व ग्रंथालय शास्त्रातील जणू संगणक असणार्‍या ग्रंथालय सेविका होत्या. पारायणेंसारखे त्यांना पण लाखो पुस्तकांच्यात कोणते पुस्तक कुठे ठेवले आहे, लेखक कोण, प्रकाशक कोण, मुल्य काय हे सारे तोंडपाठ असायचे. त्यावेळी सर्व ग्रंथालय सेविका उत्तम सेवा देत होत्या आणि आजही देत आहेत. तेही केवळ प्रतिदिनी रु. १/- इतक्या कमी सदस्य शुल्कात (ग्रंथालयाचे मासिक शुल्क रु. ३० आहे).

मात्र त्यावेळी माझा सदस्य क्रमांक ९०० च्या आसपास होता. तो दरवर्षी कमी होत होत आता चाळीसच्या आसपास आलेला आहे. बालविभाग तर नामशेष झालेला आहे. प्रौढांचा विभाग बहुतांशी पुस्तकांवर चालण्याऐवजी गृहशोभिका सारख्या मासिकांवर चालत आहे. अंदाजे लाखभर पुस्तके वाचकांची वाट पाहात आहेत. सर्व ग्रंथप्रेमींनी ह्यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

बरेच जण म्हणतात की मुंमग्र ने आता इंग्रजी पुस्तके ठेवावीत. पण इंग्रजी पुस्तके वाचनासाठी ठेऊन मराठीचा वाचक वर्ग वाढेल असे म्हणणे फारसे सुसंगत आहे असे मला वाटत नाही. अर्थात असे होऊ पण शकेल, मला नक्की कल्पना नाही.

आपल्याला काही तर्कयुक्त विचार सुचतो का?

मला एक उपाय सुचतो तो म्हणजे शासनाने फिरते ग्रंथालय निर्माण करून मुंबईत ज्या मराठी शाळा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत त्यांच्या दरवाज्यापर्यंत ही पुस्तके न्यावीत तसेच उद्योगजगताला पुरक असणार्‍या पुस्तकांचे संच करून वेगवेगळ्या उद्योगांमध्ये ते तिथल्या चाकरवर्गाला देता येतील ह्यासाठी तिथे लघुशाखा निर्माण कराव्यात. उदा. दर आठवड्याला बँकेत अर्थशास्त्राशी संबंधित वेगवेगळी पुस्तके ठेऊन तिथल्या कर्मचार्‍यांना पुस्तके वाचण्यास प्रवृत्त करणे.

असो. आपणही ह्या विषयावर चिंतन करावे व आपली मते मांडावीत.

5 comments:

 1. puNyatahi ashich paristhithi aahe i guess.. British library che subscriptions bahuda kami zali asavit .. Internet chya yugat baryapaiki pustake online milat asalyamule (e.g. www.quicksearch.info search for torrent , rapidshare links ) librarit jaun basaNyachi garajach bhasat nasavi..

  ReplyDelete
 2. hmm..aaplyaithe ashi paristhithi tar ithe americet mi pahate ekdam ulat..khara tar ithe online wachan hou shakate pan lokanchi wachanalayat bharpur uthbas aste..mi majhya tithlya anubhawa baddal blog war lihile aahe..agadi fukat nahi pan mafak darat sarva vayogatasathi vividh karyakram kele tar loka punha yetil.

  ReplyDelete
 3. @librarit jaun basaNyachi garajach bhasat nasavi..

  Hmm. But how many scanned page one can read in a day or two. I feel it is boring. Ofcourse, its my look out.

  ReplyDelete
 4. @khara tar ithe online wachan hou shakate pan lokanchi wachanalayat bharpur uthbas aste..

  Offline reading is healthy reading.

  @agadi fukat nahi pan mafak darat sarva vayogatasathi vividh karyakram kele tar loka punha yetil.

  Kalpana aavadali. Mumbait agadi velat vel kadhun karyakramanna yenar asatat.

  ReplyDelete
 5. मीही दादर (पूर्व) मराठी ग्रंथ संग्रहालयाची सदस्या आहे. बालविभाग खरोखरच दयनीय आहे. तिथे वाचणा-यांची वर्दळ असूनही आपल्यासारखे ऑनलाईन वाचणारेही बरेच असतात. मृदुलाने सुचवलेला उपाय चांगला वाटतो.
  मला तर असं वाटतं की मोठ्यामोठ्या लेखकांनी सुद्धा त्यांचं साहित्य पुस्तकरूपात प्रकाशित करण्यापेक्षा ते ऑनलाईन (अर्थातच स:शुल्क) उपलब्ध करून द्यावं. यामुळे कागदाची बचत तर होईलच पण जागाही बरीच वाचेल. ब-याचदा आपल्याला पुस्तकं आवडतात म्हणून विकत घ्याविशीही वाटतात पण घरात जागा पुरत नाही. पी.डी. एफ. हा चांगला पर्याय वाटतो. आता तर वर्तमानपत्रांच्या सुद्धा साईट्स निघाल्या आहेत. मग पुस्तकविक्रीही तशीच झाली तर उलट लेखकाला आणि प्रकाशकालाही त्या पुस्तकाचं योग्य मूल्य मिळेल.

  ReplyDelete