Showing posts with label कुसुमाग्रजांची एक सुरेख कविता.... Show all posts
Showing posts with label कुसुमाग्रजांची एक सुरेख कविता.... Show all posts

Tuesday, 28 October 2008

कुसुमाग्रजांची एक सुरेख कविता...

परमेश्वर नाही,
घोकत मन मम बसले ।
मी एक रात्री,
त्या नक्षत्रांना पुसले ॥

परी तुम्ही चिरंतन
विश्वातील प्रवासी ।
का चरण केधवा
तुम्हास त्याचे दिसले ॥ १ ॥

स्मित करून म्हणल्या
मला चांदण्या काही ।
तो नित्य प्रवासी
फिरत सदोदित राही ॥

उठतात तमावर
त्याची पाऊलचिन्हे ।
त्यांनाच पुससी तू,
आहे तो की नाही ॥ २ ॥