Showing posts with label कुसुम्‍बी. Show all posts
Showing posts with label कुसुम्‍बी. Show all posts

Sunday, 24 August 2008

कुसुम्‍बी






मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले । घन गर्द सावल्‍यांनी आकाश वाकलेले ।। पाऊस पाखरांच्‍या पंखात थेंबथेंबी । शिडकाव संथ होता झाडे निळी कुसुम्‍बी ।।
तळपायावर मेंदी ओली
अनघड कुठल्‍या गाण्‍यामधली । मंद्र मदालस तिच्‍या निळ्‍या डोळ्‍यांत उतरली लाल पाखरे नभाळ्‍यातली ।। थिरक बिथरली ती स्‍वर ओली
पैजणातली हळवी बोली ।
तळपायावर मेंदी ओली
अन्‌ भिंतीवरला रंग अबोली ।।

-
कवि - ना.धों. महानोर