सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान,
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण ।।
व्हावे एव्हढे लहान
सारी मने कळों यावी,
असा लागावा जिव्हाळा
पाषाणाची फुले व्हावी ।।
फक्त मोठी असो छाती
सारे दुःख मापायला
गळो लाज गळो खंत
काही नको झाकायला ।।
राहो बनून आभाळ
माझा शेवटला श्वास
मना मनात उरो
फक्त प्रेमाचा सुवास ।।
- म. म. देशपांडे.
Sunday, 24 August 2008
छातीत निर्भय श्वास दे...
छातीत निर्भय श्वास दे...
छातीत निर्भय श्वास दे, साथीस कणखर हात दे।
फुत्कारणार्या संकटांना ठेचणारे पाय दे ।।
ध्येय दे उत्तुंग मंगलअढळ कैलासापरी ।
कारुण्य निर्मळ वाहू देहृदयातून गंगेपरी ।।
दीनदुबळ्या रक्षणा रे, शस्त्र दे माझ्या करी ।
दु:शासनाच्या दानवी रुधिरांत धरती न्हाऊ दे।।
निष्पाप जे ते रुप तुझे उमजूं दे माझे मला ।
धर्म, जाती, पंथ यांच्या तोड आता श्रुंखला ।।
नवीन गगने, नवीन दिनकर, नवीन चंद्राच्या कला,
या नव्या विश्वात तुझ्यान्याय नीती नांदू दे ।।

स्वर्ग
कालच सकाळी मराठीच्या तासालापहिल्या बाकावरील तिने वळून पाहिले मलादोन्ही बाजूने कोपरखळ्या आल्या आणि शब्द मध्येच "मजा आहे तुझी साल्या"मग मी ही लिहिलं एक प्रेमपत्र,'प्रिये तुझ्या प्रीतीस होईन का ग पात्र?'संध्याकाळी निघालो तिच्या भेटीला,डोळे लाऊन बसलो तिच्या घरी जायच्या वाटेला,एव्हढ्यात तिची सुंदर सावली रस्त्यावर पडली अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली,हृदयाचे दरवाजे लागले धडधडू,'तिच्याशी बोलायला विषय कसा काढू?'एव्हढ्यात एका गुंडाने तिची छेड काढलीअन् त्या गुंडाची कानफडं रंगली.. तिने धावत येऊन माझा हात धरला,'आता स्वर्ग मला दोनच बोटे उरला'पण क्षणातच या सुखाला झालो मी पारखा कारण ती म्हणाली,"कसा रे धावून आलास,पाठच्या भावासारखा..."
लिलीची फुले

लिलीची फुले
तिने एकदा चुंबिता,
डोळां पाणी मी पाहिले....!
लिलीची फुले
आता कधीही पाहता, डोळां
पाणी हे साकळे....!
- पु. शि. रेगे
- पु. शि. रेगे
परिमळांमाजी कस्तुरी...
जैसे हरळांमाजी रत्नकिळा ।
कि रत्नांमाजी हिरा निळा ।
तैसी भाषांमाजी चोखळा ।
भाषा मराठी ।।
जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी ।
परिमळांमाजी कस्तुरी ।
तैसी भाषांमाजी साजिरी ।
भाषा मराठी ।।
पखियांमध्ये मयोरु ।
रुखियांमध्ये कल्पतरु ।
भाषांमध्ये मान थोरु ।
मराठीयेसी ।।
तारांमध्ये बारा राशी ।
सप्तवारांमध्ये रवि-शशि ।
या दीपिंचेया भाषांमध्ये तैसी ।
बोली मराठीया ।।
- फादर स्टिफन्स
कि रत्नांमाजी हिरा निळा ।
तैसी भाषांमाजी चोखळा ।
भाषा मराठी ।।
जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी ।
परिमळांमाजी कस्तुरी ।
तैसी भाषांमाजी साजिरी ।
भाषा मराठी ।।
पखियांमध्ये मयोरु ।
रुखियांमध्ये कल्पतरु ।
भाषांमध्ये मान थोरु ।
मराठीयेसी ।।
तारांमध्ये बारा राशी ।
सप्तवारांमध्ये रवि-शशि ।
या दीपिंचेया भाषांमध्ये तैसी ।
बोली मराठीया ।।
- फादर स्टिफन्स
Saturday, 23 August 2008
विदर्भातला शेतकरी..
शेतकर्यांना कर्जमाफ झाल्यापासून गेल्या विदर्भात ८ दिवसांत २२ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. ही बातमी खरोखरच चटका लावणारी आहे.
बळीराजा हा आपला अन्नदाता, त्याच्या आत्महत्यांनी महाराष्ट्र ढवळून निघायला हवा पण दुर्दैवाने तसे झाल्याचे दिसत नाही ह्याचे मुख्य कारण ह्या सततच्या आत्महत्या केवळ विदर्भापुरत्याच मर्यादित आहेत.
तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रात शेतकर्यांचे प्रामुख्याने ४ प्रकार१) कोकणातला २) खानदेशातला ३) विदर्भातला ४) मावळ प्रांतातला.
कोकण प्रांतात पाऊस भरपुर पण पाणी साठवण्याची तंत्रे कमी त्यामुळे बहुतांश पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाते. नगदी पीके (ऊस, कापूस) नाहीत. त्यामुळे शेतकर्यांकडे मुळातच पैसा कमी (पैसा मुख्यत: आंबा बागायतदारांकडे). परिणामी अंथरुण पाहून पाय पसरायची प्रवृत्ती. खानदेशात पण पाण्याचे दुर्भिक्ष्य पण द्राक्ष, केळीने हात दिलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र सुपीक आणि जलसंपन्न तसेच सत्ताधार्यांचे लाडके अपत्य. सत्ताधार्यांचे अनेक निर्णय मावळाला विशेषत: बारामतीला पूरक.
राहता राहिला विदर्भ. माझे विदर्भाबद्दलचे ज्ञान तोकडे आहे पण मी असे वाचले आहे की विदर्भातील शेतकर्यांची सांपत्तिक स्थिती खरे तर कोकणी शेतकर्यापेक्षा बरी. पण सामाजिक दर्जा जपण्यासाठी करावे लागणारे खर्च विशेषत: प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष हुंडा, जेवणावळी, इतर लग्नखर्च, श्राद्धकर्मे खर्च अपरंपार.
कोकणातली लग्ने, बारशी किंवा इतर विधी झेपेल तेव्हढ्या परिस्थितीत होतो. हुंडा व्यवहार कमी. तो पण सक्तीचा नव्हे. मुख्य म्हणजे त्यासाठी मोठ्या रकमेची कर्जे काढली जात नाहीत. मात्र विदर्भात मुख्यत: लग्नखर्च अफाट आणि पिढ्यांपिढ्या त्यासाठी सावकारांकडे कर्जफेड चालूच. परिणामी ह्या कर्जाच्या डोंगरामुळेच विदर्भात आत्महत्यांचे लोण.

संस्कृत १
परवा एका लेखकू महाशयांनी विधान केले की त्यांना संस्कृत अजिबात कळत नाही. हे म्हणजे थोडेसे प्रसिद्धीचा हव्यास असणारे लोक जसे अधून मधून भडक व सवंग विधाने करून जनतेचे लक्ष वेधून घेतात तसा प्रकार झाला.
मी जर म्हटले, "मम नाम मृदुला । अहं दादरनगरे निवसामि । अहं प्रत्येक-बुधवासरे रेलयानेन वान्द्रानगरं गच्छामि । अहं युवति । अहं शिक्षिका । अहं अनुवादिका च। अहं भारतीया, महाराष्ट्रीया च। आशा नाम मम माता। अनंत नाम मम पिता।"
भले प्रत्येकालाच संस्कृत बोलता येत नसेल पण ही वाक्ये कळायला काही कठिणता असेल असे मला वाटत नाही. म्हणून मी म्हणेन संस्कृत अजिबात कळत नाही हे एक विसंगत विधान आहे.
पण भारतात बरेच जणांना संस्कृतभाषेबद्दल, भारतीय संस्कृतिबद्दल येता जाता काहीतरी पिंक टाकायची सवयच आहे. त्यातच त्यांना भूषण वाटते.
संस्कृतबद्दल सर्वात मोठा गैरसमज म्हणजे ही अध्यात्माची भाषा असून ती विशिष्ट जातीशी निगडित आहे. संस्कृतमधील आद्यकाव्य रामायण ज्यात १ लाखापेक्षा जास्त श्लोक आहेत ते एका वाल्मिकी नावाच्या कोळ्याने रचले आहे. संस्कृतमधील महाकवि कालिदास हा गुराखी (गवळी समाजाचा) होता. महाभारतात ज्याच्या तोंडी संस्कृत संवाद आहेत तो कर्ण सूतपुत्र (सूत=सारथी) होता. म्हणजे आजच्या काळातील ड्रायव्हर / टांगेवाला समाज.
इतकेच काय शंकराचार्याशी ज्याने वादविवाद केला तो चांडाळ (समाजाचा) म्हणजे स्मशानात काम करणारा होता. पण लोकांची उगीचच धारणा आहे की संस्कृत ही पुरोहित वर्गाची भाषा आहे आणि हा गैरसमज ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर दोघांनीही मनापासून जपलाय. ब्राह्मण संस्कृतवरील आपला हक्क सोडायला तयार नाहीत आणि ब्राह्मणेतरांना आज संस्कृत शिकायची संधी असूनही ती भाषा न शिकता त्याविषयी मनात येईल ते ठोकून द्यायला आवडते. मनुस्मृती न वाचताच जाळणे हा तर नेतेमंडळींचा आवडता उद्योग.
पण अगदी अलिकडच्या काळात संस्कृत उत्तम बोलणार्यांमध्ये / जाणणार्यांमध्ये शांता शेळके (देवांग कोष्टी, विणकर समाज), मारुति चितमपल्ली (भटके विमुक्त समाज), बाबासाहेब आंबेडकर (दलित समाज), गुलाम दस्तगीर बिराजदार (मुसलमान) ही मंडळी सुद्धा आहेत.
इतकेच काय माझी मैत्रिण स्वाती जाधव उत्तम संस्कृत पण्डिता आहे. आज तिला मुंबईतील लोक संस्कृतसाठी प्रचंड मान देतात.
माझी तमाम वाचकांना एव्हढीच विनम्र विनंती की केवळ वरील मुद्द्याला अनुसरून मते द्यावीत कारण पुढील भागांत मी इतर मुद्द्यांकडे वळेनच.

Subscribe to:
Posts (Atom)