Sunday, 28 September 2008

मिसळण्याचा डबा

आपल्या प्रत्येकाच्या घरात स्वयंपाकघरात स्टीलचा किंवा प्लॅस्टिकचा बऱ्याच उभट गोल वाट्या असलेला रोजच्या वापरातील
डबा असतो ज्याला मिसळण्याचा / मसाल्याचा डबा असे म्हणतात.

आमच्याकडे असा पारंपारीक स्टीलचा डबा असून त्यात सात वाट्या आहेत. ज्यात मोहरी, उडिद, हळद, जीरे, तीळ, लाल तिखट
ठेवलेले आहेत. (तीळ अश्यासाठी की ते खाल्ले पाहिजेत म्हणून. मिसळण्याचा डब्यात ते ठेवले की इतर पदार्थांसोबत घातले
जातात).

मुंबईच्या हवेला टोके, पोरकिडे, केंब्र रोजच्या वापरातील वस्तुंना सुद्धा होतात. म्हणून हळद, लाल तिखट ह्यांत बिब्बे घातलेले असतात. देशावर काही ठिकाणी मी हिंग, मसाले सुद्धा ह्या डब्यात ठेवलेले पाहिले आहेत. पण ह्या हवेंत हिंग व मसाले हवा लागली तर लवकर दगड
बनतात. म्हणून ते मिसळण्याच्या डब्यात आम्ही ठेवत नाही. तुमच्या घरातील मिसळण्याचा डब्यात काय काय असते?

2 comments:

  1. तुम्ही उडीद का बरे ठेवता?
    आम्ही सुद्धा तिखट,काळामसाला, धनेपूड, हळद, मोहोरी, जिरे,हिंग असे जिन्नस ठेवतो. मीठ मात्र त्यांत ठेवत नाहीत.
    त्याला "पाळं" असेही म्हणतात.

    ReplyDelete
  2. दिनेश, आम्ही फोडणी करताना तेल तापल्यावर मोहरी तडतडल्यावर उडिद डाळ घालतो आणि मग इतर पदार्थ म्हणून उडिद डाळ मिसळण्याच्या डब्यात ठेवतो.

    ReplyDelete