Tuesday 2 June 2009

नृशंस


माझे वडिल इझ्रायल प्रेमी असल्याकारणाने आमच्या घरात सर्वांत जास्त पुस्तके इझ्रायल, ज्यू, ज्यू तत्वज्ञान, दुसरे महायुद्ध ह्या संदर्भात होती. ना.ह. पालकरांचे "इझ्रायल, छळाकडून बळाकडे" मी अनेकदा वाचले. त्यावेळी मला दोन गोष्टींचा प्रचंड अभिमान वाटत असे - १) जगाच्या पाठीवर भारत हा असा एकच देश आहे जिथे ज्यू धर्मीयांचा केवळ ते ज्यू आहेत ह्या एका गोष्टीमुळे छळ झाला नाही. २) ना.ह. पालकरांच्या लिखाणाची दखल घेऊन त्यांना अभिवादन म्हणून इझ्रायलमध्ये एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले (लक्षात घ्या की इझ्रायल हा एक आकारमानाने महाराष्ट्राच्या १/३ देश आहे).


त्यानंतर वि. ग. कानेटकरांचे "इझ्रायल, युद्ध, युद्ध आणि युद्धच" हे पुस्तक वाचले. इझ्रायल सारखे एक चिमुकले राष्ट्र जन्मल्याक्षणी सहा क्रुर व खुनशी इस्लामी शेजार्‍यांशी कसा लढा देते व पुढे पण वेळोवेळी अतुट राष्ट्रनिष्ठा, विजिगिषु वृत्ती आणि योग्य राजकीय डावपेच ह्यांच्या जोरावर ते कसे सततच्या लढाया जिंकत जाते ते मूळातूनच वाचण्याजोगे आहे.

मी अनेकदा पाहते की लोक म्हणतात की अमेरिकेचा पाठिंबा होता म्हणून इझ्रायल तगले. पण इझ्रायल जरी अमेरिकेचे सहाय घेत असले तरी ते एक व्यापाराचा भाग म्हणून. त्यात कोणताही मिंधेपणा नाही. अनेकदा इझ्रायलने अमेरिकेला न पटणारे निर्णय घेतलेला आहेत. प्रत्येक इझ्रायली परराष्ट्रमंत्र्याने अमेरिकेला बजावले आहे की इझ्रायलला अमेरिकेची गरज नसून अमेरिकेला शीतयुद्धात मध्यपूर्वेत गैर-इस्लामिक सहयोगी म्हणून इझ्रायलची गरज आहे व अमेरिकेची अर्थव्यवस्था ज्यू धनिकांच्या हातात आहे.

तसेच केवळ अमेरिकेच्या पाठिंब्यावर जर कोणतेही राष्ट्र सशक्त बनू शकते असे जर कोणाला म्हणायचे असेल तर त्यांनी आज पाकिस्तानची अवस्था पाहावी. असो.

पुढे पुढे, इ. ९-१० मध्ये असताना इंग्रजी पुस्तके वाचायची सवय लागली. एनिड ब्लिटन, एरिक क्येस्तनर वैगरेंची पुस्तके वाचता वाचता लिऑन युरिसचा "एक्सोडस" हा पहिलाच मोठा ग्रंथ वाचला. खरेतर ती एक सुरस कादंबरी आहे. मात्र त्यातील प्रसंग हे सत्य घटनेवर आधारित आहेत. कादंबरी वाचत गेले आणि मला तिचे वेडच लागले. तिचे इतके वेळा पारायण केले की कित्येक उतारे तोंडपाठ झाले. सुरवातीला इंग्रजी शब्दांचे अर्थ संदर्भाने कळायचे. मग मी एकदा न कळलेले शब्द लिहून काढायचा व शब्दकोशात त्याचा अर्थ शोधायचा व मग पुन्हा एकदा तो उतारा वाचायचा असे चालू केले. मग ही कादंबरी पुन्हा नवी होऊन समोर आली.

विशेषत: ऑश्विट्झ, ट्रेबलिंका, बिर्केनाऊ वै. ची वर्णने वाचून अंगावर काटा उभा राहिला. युरोप आणि रशियातून ज्यूंचा समूळ नि:पात करायचा ह्या वेड्या विचारांपायी ज्या क्रुरतेने ६० लाख ज्यूंची ह्या छळछावण्यातून निर्मम हत्या करण्यात आली ती वर्णने वाचवत नाहीत. त्यातूनही जे बचावले त्यांची, विशेषत: मुलांची शारीरिक व त्याहीपेक्षा जास्त मानसिक अवस्था पाहून मन विदीर्ण होते.




आज हे सर्व आठवायचे कारण की भारतात सध्या हिस्टरी वाहिनीवर आश्विट्झ विषयी विशेष मालिका चालू आहे. ती पाहिल्यावर मनाला प्रश्न पडतो की कोणाचीही एखाद्या गोष्टीबद्दल, समाजाबद्दल इतकी टोकाची मते कशी काय बनू शकतात? मात्र जर समाजातील काहींची अशी मते बनली तरी त्यांच्या अमानवी आज्ञांचे पालन समाजातील इतर माणसे उदा. आईखमन, डॉ. योसेफ मिंगेल इ. कशी काय करू शकतात?


एखादा डेन्मार्क सारखा देश सोडला तर सरसकट सर्व युरोपीय देश ह्या ज्यूंच्या कत्तलीकडे डोळेझाक करतात किंवा स्वत:ला सुरक्षित ठेवण्याकरता स्वत:हून आपल्या देशातील ज्यूंना जर्मनांच्या ताब्यात देतात. जणू काही ज्यूंचे शिरकाण ही त्यांची स्वत:चीच इच्छा जर्मन गेस्टापो पूर्ण करीत असते. उदा. रशियामध्ये अनेक शतके ज्यूंच्या कत्तली (पोग्रोम) उघड चालू होत्या. रस्त्यात चालणार्‍या एकट्या दुकट्या ज्यूंना ठार मारणे हा काहींचा छंद होता. रशियन सरकारच अश्या गोष्टींना सतत प्रोत्साहन देत असे.
पुढे ऑश्विट्झ सारख्या छळ छावण्या झाल्यावर गाड्या भरभरून ज्यू संपूर्ण युरोप आणि रशियातून आणण्यात आले. फार कमी सहृदय लोकांनी ह्या काळात ज्यूंना आश्रय व रसद दिली. पोलंडसारख्या देशात तर दुसरे महायुद्ध संपल्यावर जे दुर्दैवी ज्यू छळ छावण्यांमधून कसेबसे वाचून परत आपल्या घरी परतायचे ह्या विचारांनी परत येताना दिसले त्यांना पोलिश लोकांनी प्रचंड विरोध केला. हे सर्व समाजशास्त्राच्या दृष्टीने अनाकलनीय आहे.

10 comments:

  1. माझ्या अल्पस्वल्प
    प्रेषक सृष्टीलावण्या (मंगळ, 06/02/2009 - 16:09)

    वकुबाप्रमाणे मी उत्तर द्यायचा प्रयत्न करते...

    १. ज्यु लोक सर्वसाधारणपणे कोणत्याही समाजाला का नकोसे वाटत असावेत?

    उ. सर्वच समाजाला ते केवळ ज्यू आहेत म्हणून नकोत असे नाही. हिंदु समाजाला व पारशी समाजाला ते नक्की चालतात. ख्रिश्चनांना ते ज्यू आहेत म्हणून चालत नाहीत कारण ख्रिश्चन त्यांना येशु ख्रिस्ताचे मारेकरी समजतात. मुस्लिमांसाठी तर ज्यूच नव्हेत तर हिंदु सुद्धा परके. सर्वच गैर-इस्लामी काफिर.

    २. सावकारी करणारे, व्याजाने लुबाडणूक आणि फसवणूक करणारे कोणत्या समाजाला आवडतात?

    कोणत्याच समाजाला आवडत नाहीत. कोणत्याही भारतीय चित्रपटात मारवाडी शेठची प्रतिमा पहा. त्यांना कंजुस, धूर्त, विधिनिषेध न बाळगणारेच दाखविले जाते. मात्र मारवाड हा प्रदेश भौगोलिक दृष्ट्या दुस्तर आहे. जिथे पाण्याचा थेंब पण जपून वापरावा लागतो तिथे आपोआप काटकसरीपणा येतोच. तसेच एकदा जन्मभूमीची नाळ तुटली व जीवनासाठी संघर्ष करावा लागला की नीतीमत्ता राखण्याचे प्रमाण कमी होत जाते. आजही सिंधी व्यापार्‍यांबद्दल लोक काय म्हणतात ते कान उघडे ठेवून ऐकले की ते जाणवते. तशीच स्थिती ज्यू समाजाची होती.

    ३. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमच्या आडनावात 'मॅन' नसेल अथवा तुमचे नाव ज्यु सदृष नसेल तर किती उचल मिळते?

    उ. फार लांब जायला नको. दादरमध्ये जर आपण टॅक्सीला हात दाखवला आणि आपल्या नंतर एखाद्या गुजराती कुटुंबाने हात दाखवला तर टॅक्सीवाला गाडी त्यांच्यासमोर नेऊन उभी करतो. हे कशाचे द्योतक आहे? जसे टॅक्सीवाल्याला ठाऊक असते की गुजराती ग्राहक म्हणजे हमखास लांबचे भाडे आणि मीटरचा हिशोब न करता पैसे चुकते. तसे ज्यू व्यापार्‍यांना पैसे उचल देणार्‍यांना दामदुप्पट पैसे परत मिळण्याची हमी असते. तसेच आजही सौराष्ट्राच्या काही व्यापारी जमातींबद्दल मी असे ऐकले आहे की त्यांचे व्यापारात कितीही अधःपतन झाले तरीही कधीही पैसे उधार देणार्‍याला आणि भागिदाराला फसवत नाहीत. असेच काहीसे ज्यू व्यापार्‍यांबद्दल ऋणकोला वाटत असेल. (मान उपसर्ग असलेले आडनाव जास्त करून जर्मनांचे असते, काही जर्मन ज्युंनी पण असे आडनाव घेतल्याचे आढळते).

    ४. गेल्या काही दशकात जर अमेरिकन माध्यमे ज्यु लोकांच्या हाती नसती तर...?

    उ. तर कदाचित ज्यू धनकोंच्या युद्धखोरीला भरीस पडून अमेरिका दोन्ही महायुद्धात पडली नसती. आजही अमेरिकेला मंदीवर युद्ध हा उपाय वाटतो.

    ५. गांधीजींचे नातु (सुद्धा!) अमेरिकेतील ज्यु उदोउदो करणाला का कंटाळले असावेत?

    उ. सांगता येणे कठिण. नक्की कल्पना नाही.

    ६. अति कर्मठ व फक्त हाच धर्म चांगला व बाकी सगळे तूच्छ असे मानणारे लोक सगळ्यांना हवेसे वाटतात की नकोसे?

    उ. स्वत:च्या अनेक गोष्टींबद्दल गर्व बाळगणे हा मनुष्य स्वभाव आहे. आपल्याला आपला धर्म, भाषा, राज्य, जात, पोटजात, शाळा, गाव इ. नाही का चांगले वाटत? मात्र आजपर्यंत मी हिंदु धर्माप्रमाणेच ज्यू धर्माने सुद्धा कधी कोणाचे सक्तीने वा आमिष दाखवून धर्मांतर केल्याचे ऐकले नाही.

    ज्यु म्हणजे कोणत्याही 'बावाजी' कडून व्याजी पैसे उचलण्याचा वैयक्तिक अनुभव कुणाला आहे काय?
    असल्यास तो कसा होता?

    --------

    (बावाजी म्हणजे पारशी अशी माझी समजुत आहे आणि भारतातील ज्यू सहसा सावकारी करत नाहीत. बरेच जण तेलाचे घाणे चालवीत, म्हणून त्यांना कोकणात सरसकट "शनिवार तेली" म्हणतात. कारण ते शनिवार पवित्र समजून त्या दिवशी आर्थिक व्यवहार बंद ठेवतात. दाऊद ससून ह्यांच्या सारख्या धनिक ज्यू व्यापार्‍यांनी तर भारतात अनेक रुग्णालये, गोद्या, अनाथालये, बालसुधारगृहे, शाळा बांधलेल्या आहेत.)
    _______________________________________________
    “आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? “
    “नाही महाराज. “
    “इतर कोणाच्या पाहण्यात?”
    “नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

    “संतोष. परम संतोष."

    ReplyDelete
  2. पहिल्या महायुद्धापूर्वी
    प्रेषक सृष्टीलावण्या (मंगळ, 06/02/2009 - 16:37)

    जर्मनीत ज्यु द्वेष फारसा नव्हता, रशिया-फ्रान्स इ. च्या तुलनेत तर फारच कमी. मात्र १) पहिल्या महायुद्धात ज्यु धनकोंच्या आग्रहामुळे मंदीवर एक उपाय ह्या आशेने अमेरिका आपल्या विरुद्ध दोस्तांच्या बाजुने उतरला ही भावना सर्वसामान्य जर्मन लोकांच्यात पसरली. २) पहिल्या महायुद्धानंतर जर्मन मार्क बुडाला किंबहुना दोस्तांनी तो बुडवला. एका पावाच्या लादीसाठी एक पोते भरून मार्क द्यायची वेळ आली. मात्र त्याचवेळी जर्मनीतील ज्यु धनाढ्य लोक मजेत आयुष्य जगत होते असे हिटलर आढळून आले. ३) आज जसे २-३ भैय्या वाहनचालकांना मारून राजसाहेब हे मराठी जनतेच्या गळ्यातील ताईत बनले तसे पहिल्या महायुद्धानंतरच्या जर्मनीच्या हलाखीच्या परिस्थितीला ज्युंना जबाबदार ठरवून त्यांच्या विरुद्ध हिंसक मार्ग अवलंबून आपण जर्मन जनतेत महानायक बनू असे हिटलरला वाटले. जो त्याचा अंदाज खरा ठरला. ४) सतत स्थलांतरिताचे जिणे जगणार्‍या ज्यु समाजात पोटासाठी काहीही करण्याची तयारी होती. शायलॉक सारखे ज्यु त्या काळात युरोपियन समाजात तिरस्काराचा विषय होते. कित्येक ज्यु तर वेश्यांची दलाली ह्या व्यवसायात पण प्रकर्षाने होते. मात्र वाईझमन सारखे सज्जन, पापभीरू ज्यु सुद्धा होते पण एकदा का एखाद्या समाजाविषयी एक विशिष्ट भावना निर्माण झाली की ती बदलणे सोपे नसते. ५) सतत सर्वांकडून अव्हेरल्या गेलेल्या व सर्वत्र पोग्रोम सारख्या सामुदायिक कत्तलींना वारंवार तोंड देणार्‍या ज्यु समाजाला कोणत्याही राष्ट्राप्रति निष्ठा नव्हती. २००० वर्षे ते केवळ ज्युंचे स्वत:चे राष्ट्र ही कल्पना उराशी बाळगून होते.

    ReplyDelete
  3. वानगीदाखल
    प्रेषक सृष्टीलावण्या (बुध, 06/03/2009 - 13:17)

    इस्रायलची स्थापना झाली तेव्हा त्या भागात राहाणार्‍या लोकांना घरातून हाकलण्यात आले आणि महायुद्धात होरपळलेले ज्यू तिथे राहून बलिष्ठ झाले.

    २-३ दुवे देता येतील का? कारण मी आतापर्यंत जेव्हढी ह्या विषयावर पुस्तके दोन्ही बाजुच्या लेखकांची वाचली त्यांनी स्पष्ट असे लिहिले आहे की तिथले मूळ अरब हे मागासलेले होते. काही न करता पडिक जमीनी विकल्या जात आहेत असे कळल्यावर त्यांनी भरपूर पैसा घेऊन स्वखुषीने ह्या जमिनी विकल्या (जे आज कोकणात घडत आहे) व स्थलांतर केले. जे काही अरब तिथे उरले त्यांच्यासाठी ज्यूंनी आपल्या शाळा, दवाखाने, यंत्रगृहे विनामुल्य उपलब्ध करून दिले.

    अरबांना हाकलले गेले असेल असे वाटत नाही ह्याचे सबळ कारण म्हणजे तिथे ब्रिटिशांचे राज्य होते व "फोडा आणि झोडा" नीतीनुसार ते अरबांकडे झुकलेले होते. ज्यू - अरब दंगलींमध्ये अरबांना ब्रिटिश सर्व प्रकारची शस्त्रास्त्र मदत करीत असत.

    ReplyDelete
  4. अवांतर
    प्रेषक सृष्टीलावण्या (बुध, 06/03/2009 - 16:32)

    काही न करता पडिक जमीनी विकल्या जात आहेत असे कळल्यावर त्यांनी भरपूर पैसा घेऊन स्वखुषीने ह्या जमिनी विकल्या.

    साधारण २०-१ वर्षापूर्वी तळकोकणातील एका गावात एका माणसाला माझा मामा भेटला. त्याला म्हणाला की तुमची जमीन आहे असे कळले. तो माणुस म्हणाला, गावाबाहेर २-३ काळ्या पाषाणाचे (कमी माती असलेले) डोंगर आहेत असे तो पण ऐकून आहे. माझा मामा म्हणाला, चला तलाठ्याकडे, मला ते डोंगर विकत घ्यायचे आहेत. मग सर्व कागद पत्रे होऊन साधारण रु. १००० प्रति एकर असा भाव मामाने त्याला दिला. खरे तर त्याला ही लॉटरीच लागलेली होती.

    नंतर मामाने ते पडिक आणि भुंडे डोंगर कृषितज्ज्ञांकडून तपासून घेतले. पाणके आणून काळ्या पाषाणात पाणी कुठे लागेल ते शोधले. डोंगर माथ्यावर दोन विहिरी बांधल्या. सुरुंग लावून काळ्या पाषाणात खड्डे केले. ट्रकने पायथ्यापाशी माती आणून, गाढवांमार्फत ती डोंगरावर चढवून त्या खड्ड्यात माती टाकली. ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. ८०० कलमे आणून झाडे लावली. निगुतीने ती वाढवली. १५ वर्षांनी आता तिथे उत्तम दर्जाचे आंबे आले (कारण काळ्या पाषाणातील आंबा) आणि हे सर्व केले मुंबईत आपला व्यवसाय सांभाळून, जमेल तश्या सतत कोकणात फेर्‍या मारून.

    हल्लीच तिथे मुंबईतील एका उपाहारगृहाचे मालक पर्यटक म्हणून गेले होते. त्यांना ती कल्पना आवडली. सहज शेजारच्या जागेची खरेदीसाठी चौकशी केली तर तोच मालक आता रु. ३५,००० प्रति एकर सांगतो. कारण काहीही कष्ट न करता पैसा दारात येणार आहे. परत मुंबईकर लोक आली आणि आमच्या जमीनी गेल्या, महागाई आली असे बोलायला हेच लोक पुढे असतात. आता बोला.

    ReplyDelete
  5. फिलीस्तानी नेतृत्व
    प्रेषक सृष्टीलावण्या (बुध, 06/03/2009 - 11:27)

    फिलिस्तिन्यांचीही कदाचित पराभवांवर पराभव

    मूळात फिलीस्तानी नेते ह्यांना फिलीस्तानी लोकांच्या अडीअडचणी ह्यांच्यापेक्षा इझ्रायलचा समूळ नाश (जो अशक्य होता) ह्या कल्पनेत जास्त स्वारस्य होते. फिलीस्तानी जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा मध्यपूर्वेतील अरबांचे तारणहार होणे (अरब जगताचे एकमेव महानायक होणे) हे एकच ध्येय यासर अराफात आणि कंपनीचे होते. त्यामुळे चर्चेने प्रश्न सोडवण्यापेक्षा इझ्रायल बरोबर वांझोटी युद्ध करणे, दहशतवादी हल्ले करून जगभर इझ्रायली प्रवासी असलेल्या विमानांचे अपहरण, इझ्रायली खेळाडूंची हत्या, सीमेवरील इझ्रायली लोकांची हत्या-बलात्कार, पीकांची नासधूस हाच त्यांचा आवडता उद्योग होता. त्यामुळे त्यांचे जगभर हसे झाले. कोणीही त्यांच्या मदतीला येईना. प्रत्येक आघाडीवर त्यांना मार खावा लागला.

    ReplyDelete
  6. न्याय व सन्मान
    प्रेषक सृष्टीलावण्या (बुध, 06/03/2009 - 12:57)

    ज्यूंच्या छळाची समस्या त्यांना युरोपातच न्याय आणि सन्मान मिळून सुटणे उत्तम झाले असते.

    न्याय व सन्मान ह्या दोन शब्दांचा युरोपशी काडीमात्र संबंध नाही.

    १) युरोपातील सर्व देशांचे एकच तत्व आहे. ते म्हणतील तोच न्याय. कारण दुसर्‍यांवर अधिराज्य गाजवणे, स्वत:च्या स्वार्थासाठी इतर देशांवर स्वारी करून वसाहती निर्माण करणे, तिथे स्थानिक जनतेला नागवणे आणि वेळ प्रसंगी वंश विच्छेद हेच त्यांचे तत्वज्ञान आहे. अगदी स्वातंत्र्य, समता व बंधुता ह्यांच्या वल्गना करणारा फ्रान्स पण १९५०-५५ पर्यंत अल्जेरियावर जुलुमाने राज्य करीत होता. अल्जेरियाची स्वातंत्र्याची मागणी फ्रान्सने वेळोवेळी पाशवी बळाने चिरडली. शेकडो निदर्शकांना त्यांनी परिसच्या झाईन नदीत गोळ्या घालून मरणासन्न फेकून दिले. युरोपातील इतर देशांचा इतिहास पण अन्यायपूर्ण आणि निष्पापांच्या रक्ताने माखलेला आहे. ते काय न्याय देणार आणि कोणाला?

    २) ते फक्त स्वत:चा सन्मान करणे जाणतात. कारण इतर माणसे, त्यांच्या भाषा ह्या अगदी आजही त्यांच्या लेखी क्षुद्र आहेत. ज्यु, हिंदु, आफ्रिकन आदिवासी, मूळ ऑस्ट्रेलीय तर त्यांच्या दृष्टीने क:पदार्थ. कोणाला सन्मान देणे तर दूरच. माणुस म्हणून वागविले तरी बरे. अगदी १०-१५ वर्षापूर्वीची गोर्‍या क्रिकेटपटुंची देहबोली आठवून पहा.

    ReplyDelete
  7. येथेच म्हणजे कुठे?
    प्रेषक सृष्टीलावण्या (बुध, 06/03/2009 - 13:14)

    पण त्याच वेळी स्वातंत्र्य या कल्पनेचा जन्मही येथेच झाला हे विसरू नये...

    येथेच म्हणजे कुठे? युरोपात का? कारण स्वातंत्र्य ही मानवी भावना आहे. १६ व्या शतकात शिवाजीराजांनी पुकारलेले युद्ध गुलामीसाठी होते का? आर्य चाणक्याने ऐदी, विलासी मगध राजांच्या कचाट्यातून जनतेची सोडवणूक करायची ठरवली ती कल्पना स्वातंत्र्याची नव्हती का? महाराणा प्रतापचे युद्ध पण स्वातंत्र्यासाठीच होते.

    ReplyDelete
  8. खरे आहे.
    प्रेषक सृष्टीलावण्या (बुध, 06/03/2009 - 13:18)

    सुरुवातीचे ज्यु काही धनिक वगैरे नव्हते

    अपरंपार कष्ट हेच त्यांचे भांडवल. इतके कष्ट की आपण कल्पना पण करू शकत नाही. एक्झोडस कादंबरीत त्यांनी उदाहरण दिले आहे की रशियातून पळून गेलेल्या ज्यूंनी मजूरी करून, पै पैसा जोडून, तिथे दलदलीची जमीन खरेदी केली. दिवसाचे १४-१६ तास काम केले. सतत मलेरीया सारख्या रोगांना तोंड दिले. प्रथम दलदलीची जमीन कोरडी केली. नंतर ठिबक सिंचन पद्धत वापरून वाळवंटात शेती केली.

    तिथल्या मूळ अरबांनी मूळची दलदलीची, ओसाड, नापीक जमीन ज्यू विकत घेत आहेत म्हटल्यावर अव्वाच्या सव्वा किमती देऊन विकायला सुरवात केली व ४-५ वर्षांनी ज्यूंनी ती जमीन सुपीक करून पीक काढायला सुरवात केली की लुटालुट, खुनाखुनी, भोसकाभोसकी करून उभे पीक लुटून नेत असत किंवा (आपल्याच गुंडांविरुद्ध स्वत:च) पैसा घेऊन पिकांना संरक्षण पुरवीत.

    ReplyDelete
  9. I love & support Israel. My heart goes out for Jews whenever I see a documentary's on World War 2 and holocaust.

    http://pritash.blogspot.com/2009/02/my-opinion-published.html

    ReplyDelete
  10. Pakistan is exception. The support of the west is crucial for existence of three artificial states - Israel, South Korea and Pakistan.

    All these three states were created artificially to accommodate western strategic interests. South Korea and Israel we know where they are. Pakistan is down because the leaders there don't possess the character which is possessed by South Korean and Israeli leaders.

    ReplyDelete