Showing posts with label माझा खोटारडेपणा. Show all posts
Showing posts with label माझा खोटारडेपणा. Show all posts

Friday, 21 November 2008

माझा खोटारडेपणा

बराक ओबामा काल मला स्वत: म्हणाले, यंदाचा ख्रिसमस तुम्ही व्हाईट हाऊसमध्ये घालवायचा
बरं का ! नाहीतर तुमच्याशी कट्टी.
.
टॉम क्रुझ माझ्या बुटांना पॉलिश करताना म्हणाला, सादा पॉलिश की पेशल?
.
जयललिता माझी साडी पाहून म्हणाल्या, अय्या माझ्याकडे का नाही अशी साडी?
.
हल्ली योगविद्येत मी इतकी तरबेज झालेली आहे की पाण्यावरून पण सहज चालू शकते.
.
माझी माऊ हिमेश रेशमियाची गाणी तल्लीन होऊन ऐकते.
.
.
आपण पण कल्पनेच्या विमानात बसून खोटेपणाच्या विश्वात भरारी घेऊ शकता आणि अश्या ५ थापा
इथे लिहू शकता. मात्र १) ह्या थापा निर्मळ, हलक्या फुलक्या असाव्यात २) राजकीय भाष्ये टाळावीत
उदा. राज व भैय्या इ. पण राजकीय मंडळी चालतील. वानगीदाखल सांगायचे म्हणजे परवाच मी, राज आणि उद्धव चहाच्या टपरीवर कटिंग चहा तिथली चविष्ट खारी बिस्किटे बुडवून प्यायलो. ३) ही
थाप जेमतेम १-१. ५ ओळीची असावी. ४) वैयक्तिक दोषारोप करणे टाळावे. ५) लोकांना परिचित
व्यक्तींचाच उल्लेख करावा. अपरिचित नातेवाईक वै.चा उल्लेख टाळावा. ६) ह्या थापा मन प्रफुल्लित
करणाऱ्या असाव्यात. वाचून छान वाटले पाहिजे.