Friday, 21 November 2008

माझा खोटारडेपणा

बराक ओबामा काल मला स्वत: म्हणाले, यंदाचा ख्रिसमस तुम्ही व्हाईट हाऊसमध्ये घालवायचा
बरं का ! नाहीतर तुमच्याशी कट्टी.
.
टॉम क्रुझ माझ्या बुटांना पॉलिश करताना म्हणाला, सादा पॉलिश की पेशल?
.
जयललिता माझी साडी पाहून म्हणाल्या, अय्या माझ्याकडे का नाही अशी साडी?
.
हल्ली योगविद्येत मी इतकी तरबेज झालेली आहे की पाण्यावरून पण सहज चालू शकते.
.
माझी माऊ हिमेश रेशमियाची गाणी तल्लीन होऊन ऐकते.
.
.
आपण पण कल्पनेच्या विमानात बसून खोटेपणाच्या विश्वात भरारी घेऊ शकता आणि अश्या ५ थापा
इथे लिहू शकता. मात्र १) ह्या थापा निर्मळ, हलक्या फुलक्या असाव्यात २) राजकीय भाष्ये टाळावीत
उदा. राज व भैय्या इ. पण राजकीय मंडळी चालतील. वानगीदाखल सांगायचे म्हणजे परवाच मी, राज आणि उद्धव चहाच्या टपरीवर कटिंग चहा तिथली चविष्ट खारी बिस्किटे बुडवून प्यायलो. ३) ही
थाप जेमतेम १-१. ५ ओळीची असावी. ४) वैयक्तिक दोषारोप करणे टाळावे. ५) लोकांना परिचित
व्यक्तींचाच उल्लेख करावा. अपरिचित नातेवाईक वै.चा उल्लेख टाळावा. ६) ह्या थापा मन प्रफुल्लित
करणाऱ्या असाव्यात. वाचून छान वाटले पाहिजे.

2 comments:

 1. ०) अटलबिहारी वाजपेयी काल ’रेडियो मिरची’वर फाडफाड गाणी म्हणत होते.

  आयडिया मस्त आहे हा पण थापा मारण्याची. :) आवडली मला खुपच.

  http://my.opera.com/prabhas

  ReplyDelete
 2. वा झक्कास आहे तुमचा ब्लॉग ..
  ही पहिली थाप नाही .. :)

  हल्ली रस्त्यात खड्डे नसल्यानं गाडीच उंच उड्या मारणं बंद झालंय .. तशी थोडी जाड पण वाटायला लागलीये ती !
  .. आज सकाळीच मी मह्याला, अहो धोनीला.. काही बॅटिंग च्या टिप्स देऊन आलो...
  ..माझा computer सगळ्या जगात सुपरफास्ट आहे.
  .. आजच्या पेपर मधे एक जाहिरात दिसली नाही. सगळी कडे बातम्याच .. नाहितर लोकांची पत्र !
  .. च्याय्ला मी किती चांगलं लिहायला लागलोय !

  :)

  ReplyDelete