Monday, 25 August 2008

१७६०

मी एकदा शिवडी पुलावरून चालताना सोंगट्या (गोट्यांची बहिण) विकायला ठेवलेल्या पाहिल्या, सहज मनांत विचार आला "सोंगटी" शब्द कशावरून आला असेल. मग लक्षात आले,"सोम+गोटी" चा बोलीभाषेतील उच्चार सोंगटी झाला. सोम म्हणजे पांढरा किंवा चंद्र. पांढरी किंवा चंद्रासारखी दिसणारी गोटी ती सोंगटी.
तसेच आपण सहज म्हणतो, "ती मला १७६० गोष्टी सांगत होती". आता हा १७६० कुठून आला असेल असा विचार बरेच दिवस करत होते. पण उत्तर मिळत नव्हते.
परवा सहज वाचले कि १७६० साली पानिपतची लढाई झाली. मनांत विचार आला की पूर्वी म्हणत असतील, "१७६० च्या गोष्टी सांगत बसू नकोस (पाल्हाळ नको, मुद्द्याचे बोल)." त्यावरूनच कदाचित् वाक्प्रचार झाला असेल, "१७६० गोष्टी सांगणे".
सध्या धानी हा रंग कसा असेल व कुठल्या धान्यावरून आला असेल या वर विचार चालू आहे.आपल्याला भेडसावतात का असे शब्द?

2 comments:

  1. Vaa!! 1760 che kaay chhan vishleshaN kelet! khare tar kadhi lakshach dile nahi ki ase ka mhaNat asatil..

    ReplyDelete
  2. vaa! 1760 che kaay chhan vishleshaN kelet!! khare tar kadhi lakshach dile nahi ki ase ka mhaNat asatil..

    ReplyDelete