Monday, 25 August 2008

आयुर्वेद

पुण्यात नारायणपेठेत पत्र्या मारुतीजवळ वैद्य शेंडेशास्त्रींचा दवाखाना आहे. पूर्वी तिथे मोठी शेंडी कार्यरत होती पण आता तेथे बाळासाहेब नावाची छोटी शेंडी काम करते.
हे बाळासाहेब सुद्धा तेव्हढ्याच कमालीचे कुशल कारागिर आहेत. आजही ते काही नसा दाबून स्थानिक भूल न देता सहजतेने दात काढतात. पण त्यांचा भर दात न काढता शक्यतो ते टिकविण्यावर असतो. ते दर शनिवारी सकाळी १०.०० वाजता मुंबईत दादर स्थानकाबाहेर माधववाडीत येतात आणि आम्ही केवळ दातांवरच नव्हे तर सर्वच आजारांवर त्यांचा सल्ला घेतो. असो.
लेखाचा मुद्दा की आयुर्वेद हे एक अजब, गुढ, गहन ज्ञान आहे.
मी फार पूर्वी वाचले होते. एक सोनार असतो त्याला प्रचंड डोकेदुखीचा त्रास असतो, सगळे पाश्चिमात्य औषधोपचार, क्ष-किरण इ. तपासण्या होतात पण रामबाण उपाय होत नाही. मग त्या सोनाराला एका वैद्याची महती कळते आणि तो सोनार मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे येतो. ते वैद्य फक्त एका वैद्यकीय सुरीने कानाजवळ एक छेद देतात व वैद्यकीय चिमट्याने तिथून पाव ग्रॅम सोने काढतात. त्या सोनाराची डोकेदुखी कायमची थांबते.
झाले असे होते की सोने फुंकता फुंकता त्या सोनाराच्या नाकातून बारीक सोन्याचे कण जात राहायचे जे नासिकामार्गातून पुढे जाऊन एका विशिष्ट ठिकाणी साचत राहायचे व तिथे इतर श्लेष्म घटकांमुळे त्याचा गोळा बनलेला होता. ज्यामुळे त्या सोनाराला डोकेदुखी जडलेली होती.
गेल्या शतकात संगमनेरात बाजारपेठेत गुणे वैद्य राहायचे. त्यांच्याकडे अनेक क्लिष्ट आणि ज्यावरइतर अभ्यासक्रमाच्या डॉक्टरांनी ह्यावर इलाज नाही असे सांगितले असायचे अश्या अनेक दुर्धर रोगांवर इलाज व्हायचा आणि अनेक केईएम च्या डॉक्टरांनी त्यांना ह्याबद्दल प्रशस्तिपत्रे लिहिली होती.

No comments:

Post a Comment