कोठुनि येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतर्हृदयाला ।।
येथे नाही तेथे नाही, काय पाहिजे मिळावयाला? कुणीकडे हा झुकतो वारा? हाका मारी जीव कुणाला?
मुक्या मनाचे मुके बोल हे घरे पाडिती पण हृदयाला तीव्र वेदना करिती, परि ती दिव्य औषधी कसली त्याला !
- बालकवी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment