Monday, 25 August 2008

डायलॉग

माझे एक काका आहेत त्यांना कोणी विचारले की काय, ठीक चालले आहे ना... की ते म्हणतात, अहो कसले काय... दात पांढरे झालेत, केस हलायला लागलेत...
कधी म्हणतात... आम्ही जिलबीसारखी सरळ माणसे.. चाल्लयं कसेतरी..
असे त्यांचे संवाद झक्कास असतात. ते प्रत्येक वाक्याला हुकुमी टाळी घेऊ शकतात.
तसेच आम्ही सगळी भावंड एकत्र आलो की अनोळखी, अनवट किंवा ठेवणीतले मराठी शब्द बोलतो आणि सर्वच मराठी माध्यमातून आले असल्याने हे भारी भारी शब्द समजून घेऊ शकतात आणि त्यावर कोट्या करू शकतात. बरेचदा आम्ही मराठी नाटकातील संवाद सुद्धा प्रसंगानुरुप चपखलपणे फेकतो.
म्हणजे हेराफेरी (परेश रावलचा), शोले अश्या चित्रपटातील खुमासदार हिंदी संवादसुद्धा वापरतो पण क्वचित्. (कारण मराठीचा जाज्वल्ल्य अभिमान नसानसांत मुरलाय ना...) हे मराठी संवाद फेकण्यासाठी "असा मी असामी" ही आमचे सर्वात आमची सर्वांत आवडती संहिता आहे... कुठलाही प्रसंग असो फेका असामीतला एक डायलॉग.
पण परवाच माझा भाऊ म्हणालाय, आगरी रामायणात असेच धमाल संवाद आहेत, मी लवकरच त्याचा पण रट्टा मारणार आणि मग करणार चालू त्यातील पण संवाद फेकणे ...

No comments:

Post a Comment