Monday, 25 August 2008

न्यूनगंड

शन्ना नवरेंचे शन्ना डे नावाचे मस्त पुस्तक आहे त्यातील ते एका लेखातील प्रसंग...
लेखक एकटे राहणार्‍या मित्राच्या घरी जातात तर त्याच्या घरी भूकंप झाल्यासारखी स्थिती... सर्व वस्तु इकडे तिकडे विखुरलेल्या... पलंगावर तर स्मरणशक्ती स्पर्धेत मेजावर मांडलेल्या असतात तश्या अपरंपार वस्तु असतात.
लेखक विचारतो, "अरे हे काय?"
तो उत्तरतो, "ह्याला पसारा म्हणतात"
त्यावर शन्ना म्हणतात, "अरे पण तू झोपतोस कसा?" त्यावर तो मित्र शांतपणे पलंगावर घातलेल्या चादरीची दोन टोके शन्नांना देतो उरलेली दोन आपण धरतो आणि त्याचे गाठोडे करतो. कपाटातून दुसरी चादर काढतो. पलंगावर घालतो आणि मस्तपैकी आडवा होऊन म्हणतो, "हे असे."हे पुस्तक वाचून अनेक वर्षे झाली तरी तो लेख अजुनही मला लक्षात आहे कारण मी स्वत:पसारा-भक्त आहे. मला पसार्‍यातून अचूकपणे मला हवी ती वस्तु मिळते.
माझे टापटीप नातेवाईक आले आणि त्यांनी स्वच्छतेवर व्याख्यान दिले की मला न्यूनगंड की काय म्हणतात तो छळतो पण तो फार काळ टिकत नाही. नातेवाईक गेल्यावर घटका-दोन घटका हा न्यूनगंड मला ग्रासतो. पुन्हा ये रे मागल्या...

No comments:

Post a Comment