Monday 25 August 2008

वैदर्भी बोली

वैदर्भी बोली खरेतर संस्कृतशी अधिक जवळीक असणारी. मात्र तिची खुमारी पाहायची असेल तर बुवा उपाध्यांची भगवत् गीता वाचावी. भगवत् गीतेशी एव्हढा लडिवाळपणा करण्याची हिंमत दुसर्‍या कोणत्या भाषेची वा बोलीची झाली असेल असे वाटत नाही.
बुवा लिहितात -
पार्थ म्हणे गा हृषीकेशी,या युद्धाची ऐशीतैशी,बेहत्तर आहे मेलो उपाशी,पण लढणार नाही.
धोंड्यात जावो हि लढाई,आपल्या बाच्याने होणार नाही,समोर सारेच बेटे, जावाई,बाप, दादे, काके.
अरे लढाई असते का सोपी ..मारे चालते कापाकापी,कित्येक लेकाचे संतापीमुंडकी ही छाटती.
मग बायका बोंबलती घरी,डोई बोडून करती खापरी,चाल चाल कृष्णा माघारी,सोड पिच्छा युद्धाचा.
ऐसे बोलून अर्जुन,दूर फेकून धनुष्यबाण,खेटरावाणी तोंड करूनमटकन खाली बैसला.
मग कृष्ण अर्जुनाला समजावतो -
कृष्ण म्हणे रे अर्जुना,हा कोठला रे बायलेपणा,पहिल्यानं तर टणटणाउडत होतासी लढाया.
तू बेट्या मूळचाच ढिला,पूर्वीपासून जाणतो तुला,परि आता तुझ्या बापाला हीसोडणार नाही बच्चमजी.
आहाहा रे भागूबाई,म्हणे मी लढणार नाही,बांगड्या भरा की रडूबाईआणि बसा दळत.
वर्‍हाडी बोलीची लज्जत समजण्यासाठी एव्हढे नमुने पुरे व्हावेत.
वि. सू. - मूळ कवीची इथे लेखनास अनुमति प्राप्त, चिंतातुर जंतुंनी काळजी करू नये ही वि.वि.

No comments:

Post a Comment