जम्बो जेट जम्बो जेट झुऽऽऽऽऽऽऽऽऽऽई
(चाल - अशोक कुमारच्या 'रेलगाडी रेलगाडी' ची)
जम्बो जेट जम्बो जेट,लंडन-मुंबई प्रवास थेट,जगलो वाचलो पुन्हा भेट,जम्बो जेट जम्बो जेट झुऽऽऽऽऽऽऽऽऽऽई
विमानात होता माथेफिरु,त्याचा झाला भेजा सुरू,तो म्हणाला पायलटला,विमान वळव बैरुटला,विमान उतरव त्या शेतात,पिस्तुल आहे ह्या हातात,जम्बो जेट जम्बो जेट झुऽऽऽऽऽऽऽऽऽऽई
ठेवीन प्रवासी तुमचे ओलीस,मग काय करतील तुमचे पोलीस,जम्बो जेट जम्बो जेट झुऽऽऽऽऽऽऽऽऽऽईअरे जम्बो जेट जम्बो जेट झुऽऽऽऽऽऽऽऽऽऽई
मधल्या ओळी आठवत नाहीयेत, कोणाला आठवल्या तर जरूर लिहा आणि तुम्हाला जर अशी भटकंती गाणी येत असतील तर भटकंती - ३, ४ इ. भाग सुद्धा लिहिलेत तरी हरकत नाही.
Monday, 25 August 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
मी याच्याच कित्येक दिवस शोधात होतो. पण मला काही हे गण पूर्ण मिळाला नाहीये. मिळाला तर कृपया पोस्त करणे.
ReplyDelete-राजस
जेटात होते अरब सहा
ReplyDeleteप्रत्येकाच्या बायका दहा
प्रत्येकीची भूक पाहा
व्हेज नॉनव्हेज काय पण येऊ द्या
हाणती स्पेटी मागून स्पेट
जेटात एक म्हातारी होती
तऱ्हा तिची सातारी होती
ऐकून तिची बडबड वाटतेय
झडलाय झेंडू उरलाय देठ
जंबोजेट आता सुटणार आहे
सुटल्यावरती उडणार आहे
आणि लगेचच घेणार आहे पेट
माझ्या ओठातली सिगरेट