आपल्याकडे बरेच जणांना वाटते की एकतर आपले मूल अतिशय बुद्धिमान आहे किंवा इतरांच्या तुलनेत कमी बुद्धिमान आहे ज्याचा त्या मुलाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. उदा. आपल्याला आपले मूल अतिशय बुद्धिमान आहे असे वाटत असेल तर आपण त्या मुलाने डॉक्टर अथवा काँप्युटर इंजिनीयर व्हावे म्हणून प्रयत्न करतो आणि जर आपल्याला आपले मूल इतरांच्या तुलनेत कमी बुद्धिमान आहे असे वाटत असेल तर आपण त्याच्यावर अभ्यासाचे अवाजवी दडपण आणतो, त्याला वेगवेगळी टॉनिके पाजतो. थोडक्यात सांगायचे तर दोन्ही प्रकारात आपण त्या मुलाचा जीव नकोसा करून सोडतो.
पण आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणते की सर्व मुले सारखीच बुद्धिमान आहेत. किंबहूना समान बुद्धिमत्ता सूत्र हाच आधुनिक शिक्षणशास्त्राचा पाया आहे.
मुलांच्या बुद्धिमत्तेला ओळखा.
थोर शिक्षण मानसशास्त्रज्ञ हॉवेल गार्डनरच्या मते मुलांच्यात एकूण आठ प्रकारची बुद्धिमत्ता असते आणि प्रत्येक पालकाने / शिक्षकाने मुलाच्यातील विविक्षित बुद्धिमत्ता ओळखून त्याला योग्य ते प्रोत्साहन दिले पाहिजे.
१) भाषिक = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले लेखन, वाचन, कथाकथन, कोडी सोडवणे ह्याचा आनंद लुटतात.
२) तार्किक-गणिती = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले नमुने, प्रतवार्या, परस्पर संबंध, गणिती समस्या, व्युहरचनात्मक खेळ आणि विविध प्रयोग ह्यात रमतात.
३) शारीरिक हालचाल = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले शारीरिक संवेदनांनी ज्ञान ग्रहण करतात. ही मुले नृत्य, खेळ, विणकाम, भरतकाम, रांगोळी, हस्तकला, काष्ठकाम, शिल्पकला इ. प्रकारात रमतात.
४) अवकाशीय = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले जिगसॉ पझल, भुलभुलैय्या, लेगो खेळ (मेकॅनो), रेखाटणे किंवा दिवास्वप्नांत रमतात.
५) सांगीतिक = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले सतत ताल धरतात, गुणगुणतात. त्यांना इतरांना न ऐकू येणारे नाद आपल्या आजूबाजूच्या वातावरणात ऐकू येत असतात उदा. पाणी ठिबकणे, पाखरांचे कूजन. ही मुले उत्तम श्रोता असतात.
६) अंतर व्यक्तिगत = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले जन्मजात नेते असतात. त्यांच्याकडे उत्तम संवादकौशल्य असते, ते दुसर्यांचे अंतस्थ हेतू, भावना जाणतात. बरेचदा ही मुले दुसर्यांचे गुणदोष ओळखून त्यांच्यावर वर्चस्व गाजवतात.
७) स्वाधीन व्यक्तिगत = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले बरेचदा लाजाळू असतात. पण त्यांना स्वत:च्या भावनांची, मर्यादांची / वकूबाची जाणीव असते. ही मुले स्व-प्रेरित असतात.
जाता जाता : जिज्ञासूंनी ह्या विषयावरील अधिक माहितीसाठी इथे भेट द्यावी.
Saturday, 23 August 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment