Monday, 25 August 2008

योगायोग



माझ्याकडे एक सुंदर मराठी शुभेच्छापत्र आहे. काय आश्चर्य, त्यातल्या ओळी ह्या चित्राला बिनचूक बसतात. अगदी एका ओळंब्यात. ह्या योगायोगाची गंमत वाटली कारण दोन कुठल्या वेवेगळ्या जगातल्या गोष्टी. एक नेटवरची तर एक छापील कागदावरची. म्हणून हे चित्र आणि त्या ओळी इथे देत आहे.



आम्ही दूध पितो.मांजरही दूध पिते.पण मांजराच्या ते अंगी लागते.
आम्ही मरेस्तोवर जगतो,मांजरही मरेस्तोवर जगते पणमांजराला ब्लडप्रेशरचे दुखणे नसते.
आम्हाला देव माहित आहे.मांजराला ते ही कळत नाही...पण त्याचा आत्मा भटकतराहिल्याचे कोणी ऐकले नाही.
पृथ्वीवरील सर्वांत हुशार प्राणीमाणूस असेलहीपण त्यानेही कधी तरी निवांतपणेम्यँव म्हणायला हरकत नाही.
खरोखरच जीवनात आपण हा निवांतपणाच घालवून बसलो आहोत. म्हणूनच येणारा सप्ताहांत आणि नवे वर्ष निवांतपणे घालवा...

No comments:

Post a Comment