किल्ल्यांवर भटकंती करताना आमची काही विशेष आवडती गाणी असायची आणि आम्ही तीअगदी आवडीने हेल काढून घसा बसेपर्यंत म्हणायचो.
किल्ल्यामधे किल्ला शिवाजी आत कसा शिरला, जंबोजेट, काळूबाई, सो गया ये जहाँ, माझी सुशीला, संध्याकाळी संध्या काळी असली अनेक भन्नाट गाणी. ही गाणी कोणी लिहिली माहित नाहीत आणि ज्याने लिहिली त्याच्या मनात बुद्धिसंपदा, स्वामीत्व हक्क इ. खुळचट कल्पनानक्कीच नव्हत्या. आम्ही ती गाणी नुसती वापरत नसू तर जो तो जमेल तशी त्यात भरच घालायचा.
त्यातील माझी सुशीला हे एक ढासू गाणं खास तुमच्यासाठी (चिंतातूर जंतुंनी कविचा पत्ता कळवल्यास लगेच कविची अधिकृत परवानगी सुद्धा घेण्यात येईल) जसे आठवेल तसे.
माझी सुशीला,माझी सुशीला,माझी सुशीला,माझी सुशीला
उंच होती गोरीपानजणू काही अप्सरामाझी सुशीला, माझी सुशीला,माझी सुशीला, माझी सुशीला
गेली होती एकदा तीमुळेकाठी फिरायलापाय घसरून आत पडलीतिच माझी सुशीला,
म्हातार्याला धक्का बसलातो ही गेला स्वर्गाला,म्हातारा गेला,इस्टेट गेली मीच राहिलो एकटा..
आपण ह्या गाण्यात साहित्यिक मूल्य वैगरे शोधायला गेलो तर निराशाच पदरी येईल पण आजही ही गाणी आठवली कि ते मंतरलेले, चिंतामुक्त दिवस आठवतात आणि मनाला एक निखळ आनंद मिळतो.
Monday, 25 August 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment