Monday 25 August 2008

धारावी दर्शन सोहळा...

आपण मुंबईत गाडीतून जाताना महालक्ष्मी पुलावर बरेचदा परदेशी पर्यटकांचा थवा दिसतो. तो महालक्ष्मीचा धोबीघाट पाहायला जमलेला असतो जे तद्दन बकवास ठिकाण आहे. आपली भारतीय मार्गदर्शक मंडळी (Tourist Guide) असली ठिकाणे दाखवून भारताची नक्की कुठली प्रतिमा दाखवू पाहतात देव जाणे.
माझे तर मत आहे की अश्या मार्गदर्शक मंडळींना हिरव्या सोललेल्या फोकाने बडवले पाहिजे.
अशीच मध्ये एकदा झोपडपट्टी पर्यटन (Slum Tourism) / धारावी दर्शन सोहळा अशी टूमनिघाली होती.
शिरस्त्याप्रमाणे सब से तेज वाहिन्यांची गिधाडे धारावीकरांना मते विचारायला गेली तेव्हा तिथल्या सुबुद्ध नागरिकांनी त्यांना सांगितले की हे परदेशी पर्यटक आपले पाहुणे आहेत त्यांना आम्ही जरुर मान देऊ मात्र त्यांना इथे घेऊन येणारी जी भारतीय मंडळी आहेत त्यांना चांगलाच चोप देऊ.
त्या नंतर कोणी ही झोपडपट्टी पर्यटनाचे नाव काढलेले दिसत नाही.

No comments:

Post a Comment