Monday, 25 August 2008

शिळा सप्तमी

आमच्याकडे एकत्र मोठ्या कुटुंबामुळे सुरुवातीला शिळं उरणे हा प्रश्न नव्हता तसेच अ-तिथी (तिथी न ठरवून अचानक येणार्‍या पाहुण्यांची) कमी नव्हती पण कालौघात कुटुंबाचे विघटन झाले आणि शिळ्याचा प्रश्न उभा राहिला.

शिळ्या भाताचा शक्यतो लसणाच्या फोडणीचा किंवा कांद्याच्या फोडणीचा भात व्हायचापण सर्वांत जास्त वेळा व्हायचा तेल, तिखट, मीठ भात.

कृति - भातात सढळ हाताने तेल घालावे. त्यात लाल तिखट भुकटी / उसळी मिरची (ताजी, ठसका लावणारी असेल तर प्राधान्य), मीठ, पावभाजीसाठी करतो तसा बारीक चिरलेला कांदा आणि दाण्याचे कूट आवडीनुसार घालून भात नीट मिसळून घ्यावा आणि वेळ न घालवता खावा. शिळ्या भाकरीसाठी पण हीच कृति पण त्यासाठी भाकरीचे बारीक तुकडे करून घ्यावेत.

ता. क.: कांदा बारीक चिरू न शकणारे, स्वयंपाक म्हणजे एक पाटी टाकणे असे विचार असणारे, शरीरयष्टी जागरूक (figure cautious) इ. लोकांनी ह्या पदार्थाच्या वाटेला जाऊ नये.

शिळ्या भाताचा छान पदार्थ म्हणजे रात्री भात दुधात कालवायचा आणि विरजण लावायचे. दुसर्‍या दिवशी त्यात उसळी मिरची अथवा पोलं (लाल सुकी मिरची तेलात तळून) आणि मीठ घालून खायचा. प्रवासात न्यायला पण चांगला.

No comments:

Post a Comment